Wednesday, September 10, 2014

तू..

तू पुन्हा निघून जातेस..
माझी नजर भिरभिरते
तुझ्या शोधात,,
तुझ्या प्रेमाच्या शोधात..

तू माझ्याजवळ बसलेली..
हातातला हात सुटत नाही..
तू बोलत असतेस..
आणि मी मात्र खेळत असतो तुझ्या बोटांशी..

तू बोलायचं थांबवतेस..
दूर होतेस..
अन.. निघतेस..
तू जात असताना
तुझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे
मी एकटाच बघत असतो..
स्तब्ध..

माझं मन हेलकावे खावू लागत..
पुन्हा नजर भिरभिरू लागते..
ती पुन्हा शोध घेते तुझा..
तुझ्या प्रेमाचा..

तू नसतानाही..
तुझ्या बोटांशी मी खेळत असतो..

वास्तवात..
मी तिथे एकटाच असतो..
तुझ्या आठवणींसोबत..

नेहमीसारखा..!!

-तथागत (11 सप्टे. 2014, पहाटे 1;30 मिन.)  

No comments:

Post a Comment