MY INTEREST

मला लहानपणी पासूनच चित्रपट बघण्याचा छंद होता.. आताही आहे पण आता त्याबरोबरच तो कसा तयार होत असेल.? त्यासाठी कोणती मेहनत घ्यावी लागत असेन.? याचीही उत्सुकता माझ्या मनात आहे.. तोच अनुभव घेण्यासाठी मी काही शोर्ट फिल्म करून बघितल्या..

  • पहिली शोर्ट फिल्म - 'WE ARE HUMANS' (29 Dec. 2013)


    धर्म व्यवस्थेवर भाष्य करणारी हि आर्ट फिल्म आहे.. साध्या प्रेक्षकांना म्हणजेच रिकाम डोक घेऊन चित्रपट बघणारी मंडळी ह्यांना न रुचणारी हि फिल्म, डोकं असलेल्या प्रेक्षकांना विचार करावयास भाग पाडते.


           हि शोर्ट फिल्म सपशेल आपटल्याने माझ्या डोक्यात प्रकाश पडला.. कारण माझ्या १३ मित्रांमधून फक्त तिघांनाच हि फिल्म पचनी पडली म्हणजेच समजली.. बाकीच्यांना मला ह्या फिल्म ची कथा सांगावी लागत आहे याचे वाईट वाटते.!!

       

       मात्र थोडी समजूत असलेल्यांना या फिल्मचा विषय जागतिक पातळीवरचा आहे असे वाटते.. आणि अनेक मोठमोठ्या लोकांनी याची दाखल घेतली. मला प्रोत्साहन दिले त्यामुळे या फिल्मला पुन्हा चित्रित करून पुढल्या वर्षी चित्रपट महोत्सवात उतरविण्याचे स्वप्न सध्या मी बघत आहे.!

____________________________________________________________________________



           कॉलेज कट्ट्यावरील मुलांना या फिल्मशी काहीही घेण-देण नव्हतं असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.. कारण थोडाही विचार न करता किवा बुद्धी न वापरता हि फिल्म बघणं सोप्पं नव्हतं.. आणि मला आता त्यांच्यासाठी काही करायचं होत.. म्हणजे त्यांना डोकं न वापरता बघता येणारा विडीओ मला डोकं लावून तयार करायचा होता.. मग काय.. कुणीही न ऐकलेलं एक चित्रपटातील गाण उचललं आणि लिहिली त्यावर स्क्रिप्ट.. १० मिनिटात सिन्स तय्यार.. आणि काही दिवसांनी अवतरला माझा दुसरा विडीओ..

No comments:

Post a Comment