
माझ्या सताड उघड्या डोळ्यात
नाचतोय उज्ज्वल भारत..
सलतेय त्याची प्रतिमा..
अन
मला प्रश्न पडतोय
लख्तरं पांघरून बसलेल्या झोपड्यांचा..

मला दिसतेय
तंबूचा खांब पकडून असणारी म्हातारी,
पावसात झोपड्यावर प्लास्टिक पांघरणारा बाप..
अस्ताव्यस्त भांडी जमा करणारी आई..
व जवळच तापाने फणफनत रडणारी बहीण.
आणि
अश्या अनेकांच्या जिंदगीवर हसणारा,
रौद्ररूप धारण केलेला पाऊस..!!
कुणा एका इमारतीत
दगडासारखं निपचित पडलेलं माझं शरीर
खिडकीतून बघतंय अ(व)काली पाण्याचं तांडव
आणि
मला न कळता
गोठलेल्या माझ्या डोळ्यातूनही
अलगद पडतंय पाणी..
Photo Courtesy - Google.com
First Three Photos of Land Sliding at MALIN Village. Last photo uploaded from GOOGLE.Com