Monday, July 21, 2014

एक कविता..

मी..
एक स्वप्न होऊन जातो..
जेव्हा असतो तुझा हात..
माझ्या हातात..

माझ्या संपूर्ण भावना
हरवून जातात..
तुझ्या डोळ्यात दिसतात मला,
माझ्याच संवेदना..
तू असतेस माझं सर्वकाही..
पण कदाचित,
मी तुझा अंश देखील नसतो..

गरजल्यावर पडतो पाऊस जसा
थेंबा- थेंबाने..
मी तसाच रडत बसतो,
मनातल्या मनात..
न गरजता..तू गेल्यावर..
तू परत येईपर्यंत..

आणि कदाचित हे सत्र,
नेहमी असच सुरु असतं..

तू येते अनं जातेस..
मनातला पाऊस मात्र थांबत नाही..
तो फक्त वाट बघतो,
तू माझी होण्याची...

तुला कळलंच असेन..
मी तुझा हात का पकडून ठेवतो ते..!!

-तथागत